Anandghan
मन कशात लागत नाही अदमास कशाचा घ्यावा अज्ञात झऱ्यावर रात्री मज ऐकू येतो पावा.... ******* प्राजक्त ****** कशास काही कळतच नाही पहाटेस प्राजक्त फुलतो आहे सुवसाची उधळण करीत च आहे तो मागत नाही काही , देणं त्याला कळत ओंजळभर फुलात गंध अमाप सुख देतो आपण मात्र त्यातही व्यवहार शोधतो माझी किती फुल अन तुझी किती देणं खर तर निसर्गाचं.... पण आपण माणूस त्यावर पण आपलाच हक्क गाजवतो का अस वागतो..? कधीतरी बघावं की सगल्यावरचा हक्क सोडून जमेल नक्की जमेल..अवघड तस काहीच नसतं हसून पाहिलं की सार जग आनंदी दिसत आणि . रडून पहिलं तर जग मात्र उदास दिसत शेवटीं जगायचं कसं आपलं आपण ठरवावं कारण शेवटी... पहाट झाली की प्राजक्त फुलणारं आणि.. रात्र झाली की रातराणी उमलनारच... निसर्ग त्याच्या वेळेत त्याच्या गोष्टी पुढे नेतोच थांबतो तो माणूस असतो....थांबतो तो.........~~ दीपाली..